सरकार नोकरदारांना देणार मोफत १५ हजार! तुम्हीही घेऊ शकता लाभ; वाचा सविस्तर...

    23-Jul-2024
Total Views |
 Nirmala Sitharaman
 
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवार, दि. २३ जुलै २०२४ सकाळी ११ वाजता 2024-25 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प संसदेत सादर केला. हा मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिलाच अर्थसंकल्प आहे. तर निर्मला सीतारामन यांनी अर्थमंत्री म्हणून सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात त्यांनी पहिल्यांदाच नोकऱ्या मिळवणाऱ्यांना भेट दिली आहे.
 
सीतारामन म्हणाल्या की, संघटित क्षेत्रात पहिल्यांदा नोकरी सुरू करणाऱ्यांना एक महिन्याचा पगार दिला जाईल. हा पगार डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) द्वारे तीन हप्त्यांमध्ये दिला जाईल. सीतारामन पुढे बोलताना म्हणाल्या की, "रोजगार आणि कौशल्य विकास हा सरकारच्या नऊ प्राधान्यांपैकी एक आहे. या अंतर्गत पहिल्यांदा नोकरी शोधणाऱ्यांना खूप मदत मिळणार आहे. संघटित क्षेत्रात नोकरी सुरू करणाऱ्यांना एक महिन्याचा पगार दिला जाईल. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये देण्यात येणार आहे.