‘नीट’प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी

23 Jul 2024 12:21:49

Suprime court
 
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सोमवार, दि. 22 जुलै रोजी केंद्र सरकार आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांना वैद्यकीय पदवी प्रवेशपरीक्षेसाठीच्या कॅनरा बँकेच्या शाखांमध्ये संग्रहित केलेल्या प्रश्नपत्रिकेच्या सेटच्या वापरासंबंधी तपशील सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रश्नपत्रिकांचा एक संच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये संग्रहित करण्यात आला होता, तर प्रश्नपत्रिकांचा दुसरा संच कॅनरा बँकेच्या शाखांमध्ये संग्रहित करण्यात आला होता.
 
एसबीआयच्या प्रश्नपत्रिकेत कोणतीही तफावत किंवा लीक झाल्यास कॅनरा बँकेचा संच बॅकअप म्हणून वापरला जाणार होता. असे असूनही, काही केंद्रांवर कॅनरा बँकेची प्रश्नपत्रिका वापरण्यात आली. याप्रकरणी सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. जेबी परडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने एनटीएला या संदर्भात तपशीलवार माहिती देण्यास सांगितले आहे.
 
विशेष म्हणजे, खंडपीठाने ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली’स ‘नीट’ प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 19 मधील प्रलंबित गोंधळ सोडवण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी आयआयटी दिल्लीच्या तीन तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाणार असून त्यांना मंगळवार, दि. 23 जुलै रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलना पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0