मुंबई : सध्याच्या तरुणाईमध्ये टॅटूची क्रेज जास्त वाढताना दिसत आहे. तर शरीराच्या अनेक भागांवर म्हणजेच हात , पाय , मान अश्या अनेक ठिकाणी टॅटू काढण्याची फॅशन आहे. परंतू सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना मात्र टॅटू काढण्यास सक्त मनाई केली जाते.
आपल्या देशात अनेक सरकारी नोकऱ्या आहेत. त्यात उमेदवाराने शरीरावर टॅटू काढण्यास मनाई आहे. तर अंगावर टॅटू असल्यास सरकारी नोकऱ्या मिळत नाहीत. उमेदवार परिक्षा देतो. त्यानंतर शाररिक चाचणीपर्यंत देखील पोहोचतो परंतू केवळ टॅटूमुळे तो नाकारला जातो.
टॅटू असेल तर 'या' नोकऱ्या मिळणार नाहीत :
१. भारतीय प्रशासकीय सेवा - IAS
२. भारतीय महसूल सेवा - IRS
3. भारतीय पोलीस सेवा - IPS
४. भारतीय परराष्ट्र सेवा - IFS
५. भारतीय हवाई दल
६. भारतीय तटरक्षक दल
७. इंडियन आर्मी
८. भारतीय नौदल
९. पोलीस
तर टॅटूचे परिणाम तरुणांच्या सरकारी नोकरीवरच होत नाही तर त्याचे दुष्परिणाम शरीरावर देखील होतात. भयंकर अश्या त्वचेच्या रोगांचा सामना करावा लागतो. तसेच अनेक आजार देखील उद्भवण्याची शक्यता असते. तर टॅटू असलेल्या व्यक्तींना सरकारी नोकरीत बंदी आहे.