ठाणे मनपाचे लोकमान्य टिळकांना अभिवादन

23 Jul 2024 16:27:55

Thane
 
ठाणे :ठाणे महापालिकेच्या विद्यमाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळकाना अभिवादन करण्यात आले. पालिकेच्या बल्लाळ सभागृहात लोकमान्य टिळक यांच्या जयंती ‍निमित्त त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे व उपायुक्त उमेश बिरारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपायुक्त जी.जी गोदेपुरे, सचिन पवार, प्र.उपमाहिती जनसंपर्क प्राची डिंगणकर यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
 
 
Powered By Sangraha 9.0