अर्थसंकल्पातून 'विकसित भारताचे' दमदार उड्डाण!

23 Jul 2024 17:18:16
 
Ashish Shelar
 
मुंबई : विकसित भारताच्या स्वप्नाकडे दमदार उड्डाण करणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. यावर आता शेलारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
हे वाचलंत का? -  अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "विरोधक पुन्हा एकदा..."
 
आशिष शेलार म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या विजयानंतर अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज जाहीर केलेला अर्थसंकल्प महिला, तरुण, विद्यार्थी, शेतकऱ्यांना भरघोस मदत करणारा, गरिबांची काळजी करणारा आणि करदात्यांना दिलासा देणारा आहे. देशाची औद्योगिक उत्पादन क्षमता वाढेलच पण सोबत पर्यावरणाचा समतोल राखला जाईल आणि रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. शिवाय शाश्वत शेतीला प्रोत्साहन मिळेल असा हा अर्थसंकल्प आहे. विकसित भारताच्या स्वप्नाकडे दमदार उड्डाण करणारा हा अर्थसंकल्प आहे," असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0