ठाण्याच्या हाजुरीत हिंदु एकवटले!

गुरुवारी शिव मंदिरात महाआरती

    02-Jul-2024
Total Views |
thane hajuri hindu
 

ठाणे :       ठाण्याच्या हाजुरी परिसरात मंदिराची विटंबना करून हिंदु बांधवांची मुस्कटदाबी करणाऱ्या मुस्लीम जिहादीविरोधात सकल हिंदु समाज तसेच अन्य अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आवाज उठवला होता. त्यानंतर सनदशीर मार्गाने लढा देत असतानाच आता सकल हिंदु समाजाच्यावतीने हाजुरी येथील शिव मंदिरात गुरुवारी (ता.४ जुलै) सायंकाळी ७ ते ९ या कालावधीत महाआरतीचे आयोजन केले आहे. अशी माहिती सकल हिंदु समाजाचे विजय त्रिपाठी यांनी दिली.

ठाण्यातील वागळे इस्टेट, हाजुरी परिसरात २३ जून रोजी हिंदू महिलेच्या घरी शहजाद शेख याच्याकडून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी, स्वतःला वाचवण्यासाठी पिडीत महिलेने परिसरातील शिव मंदिरात आश्रय घेतला असता, १००-१५० मुस्लिम पादत्राणे घालुन मंदिरात घुसले आणि पीडित महिलेला बाहेर येण्यास धमकावले. मंदिराची विटंबना करणाऱ्या या जिहादींची तक्रार सकल हिंदु समाज व अन्य हिंदु संघटनांनी पोलीस आयुक्तांकडे केली होती.

त्यानुसार, पोलिसांनी हाजुरीतील कथित नेता अफराक सिद्दीकी, त्याचा साथीदार इस्तियाक आणि अन्य एकावर गुन्हा दाखल केला. दरम्यान, मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी ठाण्यातील तमाम हिंदू भगिनी बांधवांना सकल हिंदु समाज, शंकर मंदिर, हनुमान मंदिर हाजुरी, चेकमेट हिंदु फाऊंडेशन आणि स्थानिक रहिवाश्यांकडुन आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार गुरुवार ४ जुलै रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत हाजुरीतील शिव मंदिरात होणाऱ्या भव्य दिव्य महाआरतीसाठी हिंदु बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.