काँग्रेस अध्यक्षांचा राज्यसभेत लाजिरवाणा इतिहास!

सभापतीपदाचा सर्वाधिक अपमान खर्गेंकडून, सभापती धनखड यांची सुनावले

    02-Jul-2024
Total Views |
inc president kharge rajyasabha


नवी दिल्ली :   
    आजवरच्या इतिहासात राज्यसभेच्या सभापतीपदाचा सर्वाधिक अपमान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीच केला आहे, अशा शब्दात उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी खर्गे यांना सुनावले आहे. राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि सभापती जगजीप धनखड यांच्यात जोरदार वादावादी झाली. काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खर्ग यांनी आपल्याला सोनिया गांधी आणि जनतेने सर्वकाही दिल्याची टिप्पणी केली.

दरम्यान, यावर सभापती जगदीप धनखड यांनी त्यास जोरदार आक्षेप घेतला. आपल्याला तुमच्या पातळीवर यायची गरज वाटत नाही. मात्र, ज्या ज्या वेळी तुमच्या प्रतिष्ठेस धक्का बसला, त्यावेळी सभापतीपदाने त्यास आक्षेप घेतला आहे. त्याउलट आपल्याकडून मात्र सभापतीपदाचा वारंवार अपमान झाला आहे. प्रत्येकवेळी अचानक उठून बोलण्यास प्रारंभ करण्याची कार्यशैली चूक आहे. या देशाच्या आणि संसदीय लोकशाहीच्या आणि राज्यसभेच्या कामकाजाच्या इतिहासात तुमच्याइतकी अध्यक्षपदाची अवहेलना कोणीही केली नसून आता तुम्ही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, असे सभापती धनखड यांनी म्हटले.