‘कान्स’ गाजवणाऱ्या मराठी अभिनेत्रीचं रुपेरी पडद्यावर कमबॅक; बॉलिवूडमध्ये पदार्पणाची केली घोषणा

    02-Jul-2024
Total Views |

Trupti Bhoir
 
 
 
मुंबई : अभिनेत्री, निर्माती तृप्ती भोईर बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. निर्माती आणि अभिनेत्री म्हणून ठसा उमटवलेल्या तृप्ती भोईर आता नवा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून आगामी "पारो ' द अनटोल्ड स्टोरी ऑफ स्लॅव्हरी' या चित्रपटाच्या माध्यमातून तृप्ती भोईर थेट हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक गजेंद्र अहिरे करणार आहेत. आणि अहिरे देखील बऱ्याच कालावधीनंतर हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
 
तृप्ती भोईरने आत्तापर्यंत अगडबममधील नाजूका आणि टुरिंग टॉकिज मधील चांदी अशा अनेक भूमिका साकारल्या आहेत. तर तिच्या नव्या "पारो द अनटोल्ड स्टोरी ऑफ स्लॅव्हरी' या हिंदी सिनेमात तृप्ती भोईर या प्रमुख भूमिकेत असून त्यांच्या सोबत ताहा शाह बदुशाह झळकणार असून सोबत गोविंद नामदेव आणि इतर कलाकार झळकणार आहेत. या चित्रपटाचे कथानक महिलांच्या प्रश्नांभोवती फिरणार आहे.
 
गजेंद्र अहिरे आणि तृप्ती भोईर यांचा यापर्वी टुरिंग टॉकीज हा चित्रपट आंतराष्ट्रीय पातळीवर विशेष गाजला होता. त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा या जोडीकडून अपेक्षा आहेत. 'पारो द अन टोल्ड स्टोरी ऑफ स्लॅव्हरी' या चित्रपटाची कथा तृप्ती भोईर यांची असून पटकथा आणि गीत गजेंद्र अहिरे यांची आहेत. दरम्यान, नुकत्याच झालेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ती रेड कार्पेटवर झळकली होती.