“रजनीकांत आणि माझ्यात शत्रुत्व…”, कमल हासन यांनी केला थलाइवाबरोबर काम न करण्याचा खुलासा

    02-Jul-2024
Total Views | 54
 
rajani
 
 
 
मुंबई : नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की : २८९८ एडी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून यात हिंदील आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकार एकत्र झळकले आहे. प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन यांसारखे कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहेत. यादरम्यान, कमल हासन यांनी रजनीकांत यांच्याबरोबर कसे संबंध आहेत. भविष्यात ते एकत्रितपणे काम करण्याची काही शक्यता आहे का? याबद्दल खुलासा केला आहे.
 
‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार कमल हासन म्हणाले की, “माझ्यात आणि रजनीकांतमध्ये कोणत्याही प्रकारची स्पर्धा नाही. करिअरच्या सुरुवातीच्या काळात आम्ही दोघांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. त्यानंतर आम्ही ठरवलं की, आता एकत्र काम करायचं नाही. आम्ही काही दोन स्पर्धकांसारखे नाही. रजनीकांत आणि माझे गुरूदेखील एकच होते. इतरत्र जशी स्पर्धा असते, तशी आमच्यात स्पर्धा नव्हती; तर आमच्यात नेहमी खुली स्पर्धा होती. त्यामध्ये कधीही शत्रुत्व नव्हते; तर दोन वेगळे मार्ग होते.” पुढे बोलताना त्यांनी, “आम्ही कधीच एकमेकांविषयी टीकाटिप्पणी केली नाही. महत्त्वाचे म्हणजे मी आणि रजनीकांत विशीत होतो तेव्हा हे ठरवले होते. आता आम्ही म्हातारे झालो आणि त्यानंतर आम्हाला हा शहाणपणा आला, असे नाही. त्यामुळे भविष्यात आम्हाला एकत्र काम करण्याची संधी मिळाली, तर नक्की काम करू. एकमेकांच्या चित्रपटात एखाद्या पाहुण्या कलाकाराच्या स्वरूपातदेखील काम करू शकतो”, असेही म्हटले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
मल्टीस्टारर ‘अभंग तुकाराम’ चित्रपटातून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची जीवनगाथा

मल्टीस्टारर ‘अभंग तुकाराम’ चित्रपटातून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची जीवनगाथा

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांना मानणारा मोठा वारकरी सांप्रदाय महाराष्ट्रभर आहे. तुकाराम महाराजांचं संतसाहित्य देखील पार मोठं आहे. यावरुनच संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आजपर्यंत बरेच चित्रपट मालिका येऊन गेले आहेत. तर अभंग तुकाराम हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतीच या चित्रपटाच्या टीमने देहूला या ठिकाणी भेट दिली. ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा अखंड नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर... अशा भक्तिमय वातावरणात अवघी देहूनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. जगद्गुरू संत तुकाराम महाराज..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121