"धर्माचा विनाश करण्याच्या बाता मारणाऱ्यांचा धर्मच नाश करतो"; नुपूर शर्मा यांची राहुल गांधींवर टीका

    02-Jul-2024
Total Views |
 Nupur Sharma
 
नवी दिल्ली : लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या हिंदुद्वेषी वक्तव्यानंतर त्यांचावर चौफेर टीका होत आहे. राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या भाषणात स्वत:ला हिंदू म्हणवणारे हिंसा, द्वेष आणि भीती पसरवत असल्याचा आरोप केला, त्यावर केंद्र सरकारचे मंत्री आणि भाजप नेत्यांनी राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणावर भाजपच्या माजी नेत्या नुपूर शर्मा यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, जो धर्माचा नाश करतो, धर्म त्याचा नाश करतो.
 
नुपूर शर्मा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे जो धर्माच्या विनाशाची गोष्ट करतो, धर्म त्याचा विनाश करतो. धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः। तस्माद्धर्मो न हन्तव्यो मा नो धर्मो हतोऽवधीत् ॥ अर्थात- जो स्वधर्म (हिंदू) विमुख होकर धर्म का विनाश कर देता है, उस का विनाश धर्म कर देता है। जो धर्म की रक्षा करता है, धर्म उसकी रक्षा करता है।"
 
 
नुपूर शर्मा यांनी आपल्या पोस्टमध्ये राहुल गांधी यांचे नाव घेतलेले नाही. पंरतु, त्यांनी नाव न घेता राहुल गांधींवर टीका केली. खुद्द पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शाह यांनीही संसदेत राहुल गांधींच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला होता. राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी सरकारी पक्षाने केली आहे.