'मुंज्या'नं बॉक्स ऑफिसला झपाटलं; १०० कोटींच्या क्लबमध्ये केली एन्ट्री

    02-Jul-2024
Total Views |
Munjya 
 
 
मुंबई : आदित्य सरपोतदार दिग्दर्शित मुंज्या हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे. अभिनेत्री शर्वरी वाघ आणि अभिनेता अभय वर्मा यांची प्रमुख भूमिका असलेला हा हॉरर कॉमेडी चित्रपट कमी कालावधीत १०० कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे.
बॉक्स ऑफिसवर कल्की २८९८ एडी चित्रपटाची लाट आलेली असतानाही मुंज्याने चांगलाच तग धरला आहे. मुंज्याने २० व्या दिवसापर्यंत बॉक्स ऑफिसवर ९० कोटींहून अधिक कमाई केली होती. त्यानंतर आता 'मुंज्या'ने भारतीय बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची यशस्वी कमाई केली आहे.
 
'मुंज्या'ने पहिल्या दिवशी ४ कोटींची कमाई केली होती. यानंतर या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ३५.३ कोटींचा व्यवसाय केला. दुसऱ्या आठवड्यात ‘मुंज्या’ने ३२.६५ कोटेंची कमाई केली होती. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाला चौथा आठवडा पूर्ण होण्यापुर्वीच मुंज्याने ११८.५१ कोटींची कमाई केली आहे.
 
मुंज्या या चित्रपटात कोणतीही मोठी स्टारकास्ट नाही आहे. केवळ कथानकच चित्रपटाचा हिरो आहे. आनंदाची बाब म्हणजे मुंज्याने ३५० कोटींचे बजेट असलेल्या ‘बड़े मियां छोटे मिया’ आणि २०० कोटींचा बजेट असलेल्या अजय देवगणच्या मैदान चित्रपटालाही मात दिली आहे.