"ज्यांना सख्खे भाऊ समजले नाही त्यांना..."; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना टोला

    02-Jul-2024
Total Views |
 
Shinde
 
मुंबई : ज्यांना सख्खे भाऊ समजले नाहीत त्यांना लाडकी बहीण योजना कशी कळणार? असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता लगावला आहे. मंगळवारी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान ते सभागृहात बोलत होते. यावेळी त्यांनी तुफान फटकेबाजी केली.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "तुम्ही फेक नरेटिव्ह पसरवून लोकसभेत मतं घेतली. पण तुमच्या फेक नरेटिव्हला आम्ही आमच्या पॉझिटिव्ह कामांनी उत्तर देणार आहोत. त्यामुळे जनता आता विरोधकांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. महिलांचा सन्मान करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. पण आमच्या लाडकी बहीण योजनेवर विरोधकांनी टीका केली. काही लोकं म्हणाले की, लाडक्या भावाचं काय. पण ज्यांना सख्खे भाऊ समजले नाहीत त्यांना लाडकी बहीण योजना कशी कळणार?," असा टोला त्यांनी ठाकरेंचं नाव न घेता लगावला.
 
हे वाचलंत का? -  दानवेंच्या निलंबनानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले...
 
ते पुढे म्हणाले की, "कोरोनाकाळात आयपीएल सुरु होतं पण आषाढी वारी बंद केली होती. परंतू, आमच्या सरकारने सगळे सण उत्सव, परंपरा सगळं खुलं केलं. काही लोकांचा अजेंडा फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी असा होता. पण आमची जबाबदारी अख्खा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र आमचं कुटुंब आहे," असेही ते म्हणाले.