आरोप केलेत मात्र, जबाब नोंदवण्यास टाळाटाळ! पूजा खेडकरांचा मनमानी कारभार थांबेना

19 Jul 2024 12:47:25

Pooja Khedkar
 
पुणे : जिल्हाधिकारी सुहास दिवसेंवर केलेल्या आरोपाप्रकरणी पूजा खेडकर यांना पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यांनी वाशिममध्येच आपला मुक्काम वाढवून घेतला असून त्या याबाबत टाळाटाळ करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अवाजवी मागण्यांमुळे त्यांची वाशिममध्ये बदली करण्यात आली होती. तेव्हापासूनच त्यांच्या नियुक्तीसंदर्भात अनेक नवनवीन खुलासे होत आहेत. पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंवर प्रशिक्षण काळात छळ केल्याचा आरोप केला. याप्रकरणी पूजा खेडकर यांना पुणे आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे दुसऱ्यांदा आदेश देण्यात आले आहेत.
 
हे वाचलंत का? -  जरांगेंना 'देवेंद्र द्वेष' नावाचा आजार!
 
परंतू, त्यांनी वाशिममधील विश्रामगृहात आपला मुक्काम वाढवून घेतल्याची माहिती पुढे आली आहे. दुसरीकडे, सुहास दिवसेंच्या समर्थनार्थ सर्व शासकीय कर्मचारी एकवटले आणि पूजा खेडकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. पूजा खेडकर यांच्यावरचे वाढते आरोप आणि वादग्रस्त बाबी लक्षात घेता राज्य सरकारने त्यांचे वाशिम येथील प्रशिक्षण स्थगित करण्याचे आदेश दिलेत.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0