काँग्रेसशासित कर्नाटकमध्ये सरकारचा हिंदुद्वेष उघड; शाळेत जन्माष्टमी आणि गणेशोत्सव साजरा करण्यास घातली बंदी?

19 Jul 2024 15:23:56
 Gandhi Family
 
बंगळुरू : कर्नाटकातील मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने कृष्ण जन्माष्टमी आणि गणेशोत्सवापूर्वी एक वादग्रस्त निर्णय घेतला आहे. कर्नाटकच्या काँग्रेस दि. १६ जुलै २०२४ रोजी एक परिपत्रक जारी करून मंगळुरूमधील शाळेच्या क्रीडांगणांचा गैर-शैक्षणिक हेतूंसाठी वापर करण्यावर बंदी घातली आहे.
 
दक्षिण कन्नड जिल्हा शालेय शिक्षण संचालकांनी सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांना एक परिपत्रक जारी केले आहे. शाळेची मैदाने आणि इमारतींचा वापर अशैक्षणिक कारणांसाठी करू नये, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. यासोबतच शिक्षण विभागाकडे कोणताही प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवू नये, असेही सांगण्यात आले आहे.
 
शैक्षणिक उपक्रमांव्यतिरिक्त इतर कोणत्याही कार्यक्रमाला शाळेच्या परिसरात परवानगी देऊ नये, असा स्पष्ट इशारा परिपत्रकात देण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित शाळेचे मुख्याध्यापक जबाबदार राहतील. शिक्षण विभागाच्या आदेशानंतर शाळा व्यवस्थापन मंडळाने गणेशोत्सव आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाला परवानगी नाकारली आहे.
 
सार्वजनिकरित्या आयोजित करण्यात येणाऱ्या गणेशोत्सव सोहळ्याचा कार्यक्रम कर्नाटक सरकारच्या या तुघलकी निर्णयामुळे बाधित होणार आहे. कर्नाटक सरकारने गणेशोत्सव आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीपूर्वी हे हुकूमशाही परिपत्रक जारी केल्यानंतर हिंदू संघटनांमध्ये प्रचंड संताप आहे. राज्याचा प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने (भाजप)ही यावर आक्षेप घेतला आहे.
 
दक्षिण कन्नड जिल्ह्यातील अनेक सरकारी शाळांच्या मैदानात अनेक वर्षांपासून गणेशोत्सव साजरा होत असल्याचे भाजप आणि हिंदू संघटनांचे म्हणणे आहे, मात्र यावेळी शिक्षण विभागाने नव्या आदेशाद्वारे गणेशोत्सव उत्सव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने हा आदेश तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी बेलथंगडी येथील भाजप आमदार हरीश पुंजा यांनी केली आहे.
 
सोशल मीडिया साइट X वर लोक कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारवर यावरून टीका करत आहेत. लोकांचे म्हणणे आहे की, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने शाळा-कॉलेजच्या मैदानात गणेश चतुर्थी, जन्माष्टमी आणि सरस्वती पूजा थांबवण्याचा कट रचला. सिद्धरामय्या यांनी निवडणुकीदरम्यान आपल्या सभांसाठी याच मैदानाचा वापर केला होता, असेही लोकांचे म्हणणे आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0