पूजा खेडकर प्रकरण : आई-बाप आणि लेक तिघांवरही चौकशीची टांगती तलवार

18 Jul 2024 17:10:39
 
Pooja Khedkar
 
पुणे : प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर प्रकरण चांगलंच तापलं असून आता आई, वडील आणि मुलगी या तिघांवरही चौकशीची टांगती तलवार आहे. फरार असलेल्या पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना गुरुवारी पहाटे पोलिसांनी अटक केली आहे. तर त्यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या बेहिशेबी मालमत्तेची एसीबी चौकशी करण्यात येत आहे.
 
पूजा खेडकर यांच्यावर कोट्यावधींची संपत्ती असताना ओबीसी कोट्यातून यूपीएससीची परिक्षा देणं, खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणं, नोकरीवर रुजू झाल्यानंतर खासगी गाडीवर लाल दिवा लावणं आणि वरिष्ठांच्या केबिनवर ताबा मिळवणं, असे अनेक आरोप आहेत. दरम्यान, आता या प्रकरणात संपूर्ण खेडकर कुटुंबच अडकलं आहे.
 
हे वाचलंत का? -  उद्धव ठाकरे मविआला आणखी एक दणका देण्याच्या तयारीत!
 
मनोरमा खेडकर यांना रायगड जिल्ह्यातील एका गावातून अटक करण्यात आली आहे. त्यांना आता २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. हिरकणी वाडीतील पार्वती निवास या हॉटेलमध्ये इंदू ज्ञामदेव ढाकणे असं खोटं नाव सांगून त्या लपून बसल्या होत्या. तर पुजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0