अनंत-राधिकाच्या लग्नावर ‘या’ दिग्दर्शकाने बनवला चित्रपट, अमिताभ बच्चन यांनी दिला आवाज

18 Jul 2024 12:57:36

anant and radhika 
 
 
मुंबई : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी १२ जुलै २०२४ रोजी लग्नगाठ बांधली. लाखोंच्या संख्येने पाहुण्यांनी त्यांच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती. आणि आनंदाची बाब म्हणजे अनंत-राधिकाच्या लग्नाचा अॅनिमेटेड चित्रपट बनविण्यात आला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांनी आवाज दिला आहे.
 
अनंत-राधिकाच्या लग्नाला जगभरातील पाहुण्यांनी हजेरी लावत त्यांना शुभार्शिवाद दिले होते. दरम्यान, हा सोहळा कायमस्वरुपी स्मरणात राहावा यासाठी अनंत-राधिकाच्या लग्नाचा १० मिनिटांचा ॲनिमेटेड चित्रपट दिग्दर्शक ॲटलीने बनवला आहे. यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने त्याच्या पॉडकास्टमध्ये ही माहिती दिली आहे.
 
रणवीर अलाहाबादियाने अभिनेता आकाश सिंहसोबत एक पॉडकास्ट केला. यामध्ये त्याने अंबानींच्या लग्नातील अनुभव शेअर करत म्हटले की, “लग्नाच्या दुसऱ्या दिवशी लग्नातील पाहुण्यांसाठी १० मिनिटांचा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट ॲटलीने दिग्दर्शित केला होता, हा एक ॲनिमेटेड चित्रपट होता आणि व्हॉइसओव्हर अमिताभ बच्चन यांनी केला होता. ही एक मायक्रो फिल्म होती.”
 
उद्योगपती मुकेश आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत याने राधिकासोबत साता जन्माची गाठ बांधली. दरम्यान, त्यांच्या लग्नाचे विविध सोहळे जवळपास १० दिवस होते. यात मामेरू कार्यक्रम, संगीत नाईट, शिव पूजा, गृह शांती पूजा, हळदी, मेहंदी, लग्न, शुभ आशीर्वाद समारंभ व रिसेप्शन असे कार्यक्रम होते.
Powered By Sangraha 9.0