दै. मुंबई तरुण भारत आयोजित 'महाएमटीबी राष्ट्रप्रखर वक्तृत्व स्पर्धा २०२४'

17 Jul 2024 17:44:35

MahaMTB Rashtraprakhar.jpg
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दै. मुंबई तरुण भारत तर्फे 'महाएमटीबी राष्ट्रप्रखर वक्तृत्व स्पर्धा २०२४' (MahaMTB Rashtraprakhar) आयोजित करण्याता आली आहे. दि. ३१ ऑगस्ट ही या स्पर्धेच्या प्रवेश फेरीसाठीची अंतिम मुदत असणार आहे. प्रवेश फेरीसाठीच्या व्हिडिओची वेळ २ मिनिटे ठेवण्यात आली आहे. स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असून २२ ते ५५ वयोगटातील युवा व प्रौढांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड, पनवेल, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक येथील इच्छुक लोकं स्पर्धेत आपला सहभाग नोंदवू शकतात. संपूर्ण स्पर्धा मराठी माध्यमातूनच होईल.


स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हिंदुपदपातशाह छत्रपती शिवाजी महाराज, शिवयोगिनी अहिल्यादेवी होळकर, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे क्रांतिकार्य, डॉ. हेडगेवार यांची राष्ट्रनिर्मितीची संकल्पना हे प्रमुख चार विषय असणार आहेत. प्रथम पारितोषिक रु. १,००,०००/-, द्वितीय पारितोषिक रु. ७५,०००/-, तृतीय पारितोषिक रु. २५,०००/-, उत्तेजनार्थ पुरस्कार रु. १०,०००/- (तीन पुरस्कार) ठेवण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ९५९४९६९६४५
 
 
स्पर्धेचे स्वरूप पुढीलप्रमाणे :

१) प्रवेश फेरी
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वरील दिलेल्या ४ विषयांपैकी एका विषयावर २ मिनिटांचा स्वतःच्या मोबाईलवर तयार केलेला व्हिडिओ सोबत दिलेल्या क्यूआर कोडवर पाठवावा.
२) प्राथमिक फेरी
यातून जिल्हा व विभागवार ४० स्पर्धक प्राथमिक फेरीसाठी निवडले जातील. ४० स्पर्धकांची विभाग किंवा जिल्हानिहाय ऑफलाईन वक्तृत्व स्पर्धा होईल. यासाठी प्रत्येकी ५ मिनिटांची वेळ असेल. परीक्षक यातून पुढील १० स्पर्धक निवडतील.

३) उपांत्य फेरी
या १० स्पर्धकांतून जिल्हा व विभागवार होणाऱ्या उपांत्य फेरीतून अंतिम फेरीसाठी तीन स्पर्धक पाठविले जातील. यासाठी प्रत्येकी ४० मिनिटांची वेळ असेल.

 ४) अंतिम फेरी
उपांत्य फेरी व अंतिम फेरीतील सादरीकरण प्रत्येकी ४० मिनिटे .

Powered By Sangraha 9.0