मुंबई : नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की २८९८ एडी' हा चित्रपट २७ जून रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रेक्षकांना भूरळ पाडली आहेच शिवाय बॉक्स ऑफिसवरी नवा इतिहास रचला आहे. अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पडूकोण आणि कमल हासन यांसारख्या दिग्गज कलाकारांची प्रमुख भूमिका असलेला 'कल्की २८९८ एडी' ने पहिल्या दिवसापासून चित्रपटाने बंपर कमाई केली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाने आत्तापर्यंत किती कमाई केली.
'कल्की २८९८ एडी' या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ४१४.८५ कोटी दुसऱ्या आठवड्यात १२८.५ कोटी कमावले होते. आणि सॅनसिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने आत्तापर्यंत २० दिवसांत ५८९.२५ कोटी कमावले आहेत.