लाडक्या भावांसाठी राज्य सरकारची महत्वपूर्ण योजना! वाचा सविस्तर...

17 Jul 2024 11:40:37
 
Shinde
 
पंढरपूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडक्या भावांसाठीही एका योजनेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री शिंदे हे सध्या पंढपूरमध्ये असून त्यांच्या हस्ते आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा पार पडली. दरम्यान, त्यांनी या योजनेची घोषणा केली.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "आम्ही महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरु केली असून दहमहा त्यांच्या खात्यात १५०० रुपये जमा होणार आहेत. लवकरच बहिणींच्या खात्यात हे पैसे वळते होतील. पण यावर काही लोक म्हणाले की, लाडकी बहिण झाली आता लाडक्या भावांचं काय? तर आता लाडक्या भावांसाठीही योजना सुरु केली आहे."
 
"यानुसार १२ उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्याला दरमहा ६ हजार रुपये देण्यात येणार आहे. यासोबतच डिप्लोमा पूर्ण केलेल्यांना ८ हजार आणि डिग्री पूर्ण केलेल्यांना ९ हजार रुपये प्रतिमहिना देण्यात येणार आहे. तसेच जो विद्यार्थी वर्षभर एका कारखान्यात अप्रेन्टिसशिप करेल त्याला तिथे नोकरीही लागेल. अप्रेन्टिसशिपचे पैसे सरकार भरणार आहे. इतिहास पहिल्यांदाच अशी योजना आपण सुरु केली आहे," असेही ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0