पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला असून शरद पवार गटात प्रवेश केला आहे. शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी बुधवारी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
मंगळवारी अजित पवार गटाच्या चार पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता. यात अजित गव्हाणे, राहुल भोसले, यश साने, पंकज भालेकर यांचा समावेश होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवडमधील २० नगरसेवक आणि शहरअध्यक्ष अशा एकूण २४ जणांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे अजित पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.