सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या युट्यूबरला कोर्टाकडून मिळाला दिलासा

16 Jul 2024 15:15:44

salman khan  
 
 
मुंबई : अभिनेता सलमान खानच्या घरावर एप्रिल महिन्यात गोळीबार झाला होता; तसेच त्याला जीवे मारण्याची धमकी देखील एका युट्यूबरकडून देण्यात आली होती. आत या ट्यूबरला कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. मुंबईच्या एस्प्लेनेड मॅजिस्ट्रेट कोर्टाने युट्यूबरला जामीन मंजूर केल्याचे सांगितले जात आहे. सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आणि गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी संबंध असल्याचा दावा करणाऱ्या युट्यूबर बनवारीलाल लातुरलाल गुजर याला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली होती.
 
दरम्यान, सलमान खानला धमकी देणाऱ्या युट्यूबर विरोधात धमकी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच, बिश्नोई गँगशी संबध असल्याचा मोठा दावा करणाऱ्या या युट्यूबरला पोलिसांनी १२ जून रोजी अटक केली होती. मात्र, तपासाअंती आणि चौकशीनंतर बनवारीलाल आणि बिश्नोई गँगचा कोणताच संबंध नसल्याचं समोर आलं. केवळ, लोकांचं लक्ष वेधण्यासाठी बनवारीलालने इतकं मोठं पाऊल उचललं होतं असं वकील फैझ मर्चंट यांच्यामार्फत दाखल केलेल्या जामीन याचिकेत मोठा दावा करण्यात आला.
 
दाखल केलेल्या या जामीन याचिकेत लिहिले आहे की, कोणताच ठोस पुरावा नसताना युट्यूबरला या प्रकरणात गोवण्यात आलं. फक्त मनोरंजन आणि प्रसिद्धीच्या उद्देशाने व्हिडीओ तयार करण्यात आला होता. त्यामुळे आता या प्रकरणी आणखी कोणते वळण येणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
Powered By Sangraha 9.0