देशाच्या परकीय गंगाजळीत मोठी वाढ; शेअर्समध्ये मोठी परकीय गुंतवणूक!
15 Jul 2024 17:11:36
नवी दिल्ली : देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीने विक्रमी उच्चांक गाठला आहे. परकीय चलन तब्बल ६५७ अब्ज डॉलर्सचा नवा उच्चांक देशाने गाठला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात परकीय चलनात मोठी वाढ दिसून आली असून मागील आठवड्यात पुनर्मूल्यांकन आणि परकीय गुंतवणूक यामुळे परकीय गंगाजळीत वाढली आहे.
दरम्यान, अर्थतज्ज्ञांच्या माहितीनुसार, पुनर्मूल्यांकन आणि आवक यातील संयोगामुळे परकीय गंगाजळीत वाढ दिसून आली आहे. मागील आठवड्यात परकीय चलन साठा ५.१६ अब्ज डॉलरने वाढून ६५७.१६ अब्ज रुपये झाला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ताज्या आकडेवारीनुसार, परकीय चलनातील वाढ झाल्यामुळे एकूण साठा वाढला आहे.
विशेष म्हणजे जागतिक व्यापारात डॉलरच्या किमतीत झालेली घट यामुळे काही प्रवाह बाजारात स्थिरावले. तसेच, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी डेट मार्केटमध्ये तब्बल ८,४८४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून याच कालावधीत देशांतर्गत शेअर्समध्ये १५,३५२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे समोर आले आहे.