छगन भुजबळ पवारांच्या भेटीला! नेमकं काय घडतंय?

15 Jul 2024 11:52:50
 
Bhujbal & Pawar
 
मुंबई : राज्यात सध्या निवडणूकांची रणधुमाळी सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीचे कारण अद्याप पुढे आले नसून नेमकं काय घडतंय, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी मंत्री छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर दाखल झाले. भेटीपूर्वी त्यांनी शरद पवारांची वेळ घेतली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना अर्धा ते एक तास ताटकळत बसावं लागल्याची माहितीही पुढे आली आहे.
 
विशेष म्हणजे मराठा आरक्षणाच्या बैठकीवरून छगन भुजबळांनी कालच (रविवारी) शरद पवारांचं नाव न घेता टीका केली होती. त्यानंतर आता ते थेट पवारांच्याच भेटीला गेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर छगन भुजबळ यांनी अजित पवारांची साथ दिली होती. त्यानंतर त्यांनी महायूती सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथही घेतली. मात्र, आता त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने या भेटीचं नेमकं कारण काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0