बॉलीवूडच्या प्रसिध्द गायकाला इस्लामचा पुळका, म्हणाला.....!

14 Jul 2024 13:07:14
bollywood singer islam statement


नवी दिल्ली :
         बॉलवूडमधील प्रसिध्द गायक लकी अली यांनी पुन्हा एकदा आपली कट्टर विचारसरणी दाखवून दिली आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये पीडितेचे कार्ड खेळले असून एका व्यक्तीने त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, अल्लाशिवाय या जगात दुसरा देव नाही. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'ओ सनम' या गाण्याने प्रसिद्ध झालेल्या गायक लकी अलीने पहिल्यांदा एक पोस्ट टाकून कट्टर विचारसरणी दाखवून दिली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "आज जगात मुस्लिम असणे ही एकटीची गोष्ट आहे, पैगंबराच्या सुन्नतचे पालन करणे ही एकटेपणाची गोष्ट आहे, तुमचे मित्र तुम्हाला सोडून जातील, जग तुम्हाला दहशतवादी म्हणेल, असे लकी अलीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

विशेष म्हणजे अल्लाहशिवाय दुसरा देव नाही असे सांगत गायक लकी अलीने पुन्हा धर्मांधपणा दाखविला आहे. याआधी तो म्हणाला, ब्रह्मा इब्राहिमपासून आला आहे. लकी अलीने यापूर्वी दावा केला होता की, ब्रह्म हे नाव इब्राहिमपासून आले आहे आणि ब्राह्मण हे इब्राहिमचे वंशज आहेत. या पोस्टबद्दल त्यांना नंतर माफी मागावी लागल्याचे समोर आले होते.

यानंतर आता लकी अलीने आणखी एक पोस्ट केली ज्यामध्ये त्याने सौदी अरेबियामध्ये स्वर्ग कसा अनुभवला हे सांगितले. यामध्ये त्याने मशिदीत नमाज अदा करताना एका व्यक्तीला भेटल्याचा उल्लेख केला आहे. या पोस्टमध्ये लकी अलीने अल्लाहचे आभार मानले असून सांगितले की इस्लाम सत्य आहे आणि जे इस्लामवर विश्वास ठेवतात ते धन्य आहेत.



Powered By Sangraha 9.0