संगमनेरमध्ये सकल हिंदू समाजाचा 'जन आक्रोश मोर्चा'

    13-Jul-2024
Total Views |

Sangamner News

मुंबई (प्रतिनिधी) :
संगमनेरच्या (Sangamner News) पठार भागात लव्ह जिहादचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी कथित जिहादी प्रवृत्तीच्या विरोधात शुक्रवार, दि. १२ जुलै रोजी सकल हिंदू समाज, हिंदू संघटना व आंबीखालसा गावकऱ्यांकडून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. घारगाव परिसरातील एका तरुणाने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची मदत घेऊन घारगाव बसस्थानक परिसरातून एका तरुणीला पळवून नेले होते. हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार असल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला आहे.

हे वाचलंत का? : "दोन वर्षांपासून काँग्रेसची ७ मतं..."; संजय राऊतांचा गंभीर आरोप

पोलिसांकडून याबाबत उचित कारवाई न झाल्याने हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. घारगाव बसस्थानक परिसरात मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. यादरम्यान अनेक वक्त्यांनी मुलीच्या अपहरण प्रकरणाचा कठोर शब्दात निषेध केला. या प्रकरणातील आरोपींवरुद्ध कठोर कारवाई करावी, लव्ह जिहाद कायदा त्वरित लागू करावा, आदी मागण्या करण्यात आल्या.