मुंबई : अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा १२ जुलै २०२४ रोजी मुंबईत संपन्न झाला. जगभरात ज्यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती अशा राधिका आणि अनंत यांच्या लग्नात देश-विदेशातून पाहुण्यांनी हजेरी लावत त्यांच्या नव्या प्रवासासाठी त्यांना सदिच्छा दिल्या. दरम्यान, राधिका मर्चंटचा लूक हा सध्या सोशल मिडियावर धुमाकुळ घालत आहे. नववधूने अंबानी कुटुंबाची आणि गुजराती परंपरा जपत परिधान केलेला वेश सध्या लोकांचं लक्ष वेधून घेत आहे.
राधिका मर्चंटचा लग्नसोहळ्यातील पहिला लूक अबू जानी – संदीप खोसला यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला. अनंत अंबानींची नवरी लग्नात खास गुजराती ‘पाणेतर’ लेहेंगा घालून सजल्याचं पाहायला मिळत आहे. राधिकाने गुजराती परंपरेनुसार लग्नात ऑफ व्हाइट रंगाचा सुंदर असा लेहेंगा, हातात चुडा, लाल रंगाची शाल, भरजरी दागिने असा रॉयल लूक केला होता.