मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात

13 Jul 2024 14:26:03
Mumbai
 
मुंबई : मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. मुंबईतील नरिमन पॅाइंट परिसरात जोरदार पाऊस पडत आहे.तर हवामान विभागाकडून मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई उपनगरात पावसाचा ऑरेंज अर्लट देण्यात आला आहे.
 
नवी मुंबई , ठाणे , कल्याण , दादर ,भिवंडीसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा परिणाम लोकल ट्रेनवर देखील झालाय. लोकल अतिशय धीम्यागतीने सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर आता पुढील चार-पाच तासांत मुंबई आणि उपनगरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे . 
Powered By Sangraha 9.0