अनंत-राधिकाच्या विवाहसोहळ्यासाठी 'देसी गर्ल' मुंबईत, हॉलिवूड स्टार किम कर्दाशियनही राहणार उपस्थित

12 Jul 2024 11:19:18

priyanka 
 
 
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून अनंत अबांनी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. अखेर तो दिवस आला आहे. आज १२ जुलै २०२४ रोजी दोघेही विवाह बंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नासाठी देश विदेशातून पाहुणे येणार आहेत. मुंबईतील बीकेसी येथे हा शाही विवाहसोहळा होणार असून यासाठी देसी गर्ल प्रियांका चोप्रा पती निक जोनास सोबत मुंबईत आली आहे.
 
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्याला आज लाखो पाहुणे हजेरी लावणार असून यात विविध क्षेत्रातील दिग्गजांचा सहभाग असणार आहे. याशिवाय, या लग्नसोहळ्यासाठी हॉलिवूड स्टार किम कर्दाशियनही तिच्या बहिणीसह आली आहे. ऑलिव्ह ग्रीन रंगाच्या ड्रेसमध्ये किमने देखील एन्ट्री घेतली आहे.
 
 
priyanka nick
 
दरम्यान, आज बीकेसीतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचं लग्न झाल्यानंतर १३ आणि १४ जुलै रोजी काही ही लग्नानंतरचे विधी आणि रिसेप्शन असणार आहे.
Powered By Sangraha 9.0