अनंत-राधिकाच्या लग्नात ऐतिहासिक काशी शहराची प्रतिकृती! नीता अंबानींनी दाखवली पहिली झलक

12 Jul 2024 16:48:40

nita ambani 
 
 
 
मुंबई : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट अखेर आज १२ जुलै रोजी लग्नबंधनात अडकले आहेत. गेले अनेक दिवस त्यांच्या शाही विवाह सोहळ्याची जगभरात चर्चा सुरुच होती. बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये या दोघांचा विवाहसोहळा आज झाला. जाम या दोघांच्या लग्नाआधी नीता अंबानी यांनी खास व्हिडीओ शेअर करत अनंत-राधिकाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि या शुभप्रसंगी देवाची प्रार्थना केली आहे.
 

nita ambani 
 
नीता अंबानी यांचा हा खास व्हिडीओ ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. “जय काशी विश्वनाथ! काशी या शहराबरोबर आमचं एक भावनिक व विशेष नातं आहे. कोणत्याही शुभकार्याच्या आधी देवी-देवतांचा आशीर्वाद घेणं ही माझ्या कुटुंबीयांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट असते.” असं नीता अंबानी या व्हिडीओमध्ये सांगत आहेत.
 
नीता अंबानी पुढे म्हणाल्या, “माझी दोन्ही मुलं अनंत व राधिका यांच्यासाठी खास प्रार्थना म्हणून मी काही दिवसांपूर्वी वाराणसीला गेले होते. त्यांच्या लग्नाआधी आशिर्वाद घेण्यासाठी मी त्याठिकाणी जाऊन आले. काशीला आल्यावर तेथील मूळ भारतीय संस्कृतीची जाणीव आपल्याला होते. त्यामुळे माझी मुलं लग्न करतील तेव्हा सर्वांना त्याठिकाणी काशीच्या पवित्र संस्कृतीची झलक दिसेल. काशीत महादेवांचा अधिवास आहे ही नगरी खरंच खूप पवित्र आहे. वाराणसीचा इतिहास, तिकडच्या परंपरा-संस्कृती, ऐतिहासिक वारसा या सगळ्याची झलक अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यात पाहायला मिळेल.”
Powered By Sangraha 9.0