ठाणे: निधी मिळाला नाही असे धादांत खोटे बोलणारे आ. जितेंद्र आव्हाड वैफल्यग्रस्त झाले आहेत. महायुती सरकारकडून मुंब्रा-कळव्यासाठी १०५ कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून महायुतीमधील तिनही नेत्यांनी भाऊ असल्याचे कर्तव्य केले. अशी रोखठोक भूमिका राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना मांडली. शुक्रवारी होणाऱ्या विधान परिषदेच्या ११ जागांसाठी रिंगणात असलेले महायुतीचे ९ उमेदवार विजयी होतील.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत महायुतीचे उमेदवार अधिकची मते मिळवून विजयी होतील.तर महाविकास आघाडीच्या तीन पैकी एका उमेदवाराचा पराजय निश्चित असल्याचा दावा परांजपे यांनी केला. पुढे बोलताना त्यांनी, जितेंद्र आव्हाड वैफल्यग्रस्त आहेत.२०० कोटींमध्ये इमेज मेकओव्हर हा आरोप कपोकल्पित असून हा आकडा आला कुठून २०१९ साली ज्यावेळेला राष्ट्रवादीने मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये आमदारांना ठेवले होते ते हॉटेल राष्ट्रवादी शरद पवार गटाने विकत घेतले असं म्हणायचे का ?
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून ५५ कोटी रुपयांचा विकास निधी आला. आव्हाड यांच्या सोबतच्या अनेक नगरसेवकांनी हा निधी घेतला आहे. आता पुन्हा ५० कोटीचा विकास निधी आलेला आहे व तो खऱ्या विकासासाठी वापरला जाईल. त्यामुळे निधी मिळाला नाही असं आव्हाड धादांत खोटे बोलत आहेत. रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड सातत्याने खोटे आरोप करत असतात. त्यांच्या बेसलेस आरोपांना आम्ही फारसे महत्त्व देत नाही. असा हल्लाबोल परांजपे यांनी केला.