टॉप १०० रिअल इस्टेट मूल्यांकनात वाढ; 'ही' कंपनी नंबर वन!

    11-Jul-2024
Total Views |
top real estate company


नवी दिल्ली :        देशातील टॉप १०० रिअल इस्टेट कंपन्यांच्या मूल्यांकनात प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले आहे. रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये तब्बल ७० टक्के वाढ झाली असून दिल्ली लँड अँड फायनान्स(डीएलएफ) पहिल्या स्थानावर आहे. देशातील पहिल्या १०० रिअल इस्टेट कंपन्यांचे एकूण मूल्यांकन १४.२ लाख कोटी रुपये इतके झाले आहे.

दरम्यान, मागील वर्षभरात देशातील टॉप १०० रिअल इस्टेट कंपन्यांचे एकूण मूल्यांकन ७० टक्क्यांनी वाढले आहे. एका अहवालानुसार, या १०० कंपन्यांपैकी ८६ कंपन्यांचे मूल्य वाढले असून एकूण ६.२ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. गुरुग्राम स्थित डीएलएफ रिअल इस्टेट कंपनीचे बाजार भांडवल २०५,१४० कोटी रुपये इतकी आहे.


विशेष म्हणजे डीएलएफ रिअल इस्टेट क्षेत्रातील सर्वाधिक मूल्यांकन असलेली कंपनी ठरली आहे. 2024 GROHE-Hurun इंडिया रिअल इस्टेट सूचीनुसार, डीएलएफ देशातील सर्वोच्च मूल्यवान रिअल इस्टेट कंपनी बनली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत बाजारभावात ७२ टक्के वाढ झाली आहे.

दुसऱ्या स्थानावर मुंबई स्थित मॅक्रोटेक डेव्हलपर्स असून ज्याची किंमत १३६,७३० कोटी रुपये इतकी आहे. या रिअल इस्टेट कंपनीच्या बाजार भांडवलात १६० टक्क्यांनी वाढ नोंदविली आहे. तिसऱ्या स्थानी इंडियन हॉटेल्स कंपनी असून ज्याची किंमत ७९,१५० कोटी रुपये इतकी असून त्यात देखील गेल्या वर्षीच्या तुलनेत ४३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.