दिग्दर्शक अ‍ॅटलीनेही धरला विकीच्या ‘तौबा तौबा’ गाण्यावर ठेका , अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात उडवली धमाल

    11-Jul-2024
Total Views |
 
atlee
 
 
 
मुंबई : सध्या सगळीकडे दोनच गोष्टींची चर्चा जोरदार रंगलेली पाहायला मिळत आहे. एक म्हणजे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाह सोहळा आणि दुसरं अभिनेता विकी कौशल याच्या ‘बॅड न्युज’ या चित्रपटातील ‘तौबा तौबा’ हे गाणं आणि त्यावर त्याने केलेला डान्स. या गाण्यावर सामान्यांसह अनेक कलाकारांनी देखील ठेका धरत सोशल मिडियावर रिल्स पोस्ट केल्या आहेत. यात आता जवान चित्रपटाचे दिग्दर्शक अ‍ॅटली यांचाही समावेश झाला असून त्यांनी अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात तौबा तौबा गाण्यावर डान्स केला होता.
 
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा ५ जुलैला मोठ्या थाटामाटात संगीत सोहळा पार पडला. या संगीत सोहळ्याला मुकेश अंबानींनी प्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बीबरचा परफॉर्मन्स आयोजित केला होता. तसंच बॉलीवूड सेलिब्रिटींनी जबरदस्त डान्स केला. यानंतर बादशाह व करण औजला गाण्यांवर सेलिब्रिटी थिरकताना दिसले होते. तर, अ‍ॅटली आणि विकी कौशलने ‘तौबा तौबा’ गाण्याची हूकस्टेप करत सगळ्यांचे लक्ष वेधले. यावेळी दोघांबरोबर दिशा पटानी, अर्जुन कपूर, सारा अली खान पाहायला मिळाले. अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यातील अ‍ॅटली व विकीचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
 

atley 
 
दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा १२ जुलैला विवाह सोहळा संपन्न होणार असून १३ जुलैला संध्याकाळी आशीर्वाद समारंभ होणार आहे. या समारंभाला मोजके पाहुणे उपस्थित राहणार आहेत. तर, १४ जुलैला रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला मीडिया आणि फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे.