मराठीतील ‘या’ अभिनेत्रीला अंबानींकडून लेकाच्या लग्नाचं आलं खास आमंत्रण!

    11-Jul-2024
Total Views |

ambani 
 
 
 
मुंबई : सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी याचं लग्न सध्या चर्चेचा विषय आहे. अनंत अंबानी राधिरा मर्चंट सोबत १२ जुलै २०२४ रोजी विवाह बंधनात अडकणार असून गेले काही दिवस मुंबईत सर्व प्री-वेडिंग कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरे केले जात आहेत. संगीत, हळद, मेहेंदी या कार्यक्रमांना चंदेरी दुनियेतील कलाकार मंडळींनी विशेष उपस्थिती लावली होती. परंतु, या गर्दीत मराठी कलाकार कुठेच दिसले नसल्यामुळे मराठी कलाकारांना निमंत्रण नाही का अशीही चर्चा सुरु झाली. पण, मराठीतील कलाकारांनाही अनंत-राधिकाच्या लग्नाचे आमंत्रण आले आहे.
 
सध्या मराठीसह हिंदी चित्रपट आणि ओटीटी वाहिनीवरही आपला जलवा दाखवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर हिला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाचं विशेष आमंत्रण आलं आहे. मुंबईतील जिओ सेंटरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे. गरम्यान, यापुर्वी मालिकांमध्ये काम करणाऱ्या श्रेयस राजे यालाही या लग्नाचे आमंत्रण आलं आहे.
 
१२ जुलै रोजी अनंत आणि राधिकाच्या लग्नाला देश-विदेशातून मोठी मंडळी उपस्थित राहून नवीन वर-वधूला आर्शिवाद देणार आहे. तसेच, १४ जुलै रोजी होणाऱअया रिसेप्शन सोहळ्याला हिंदीसह परदेशातील कलाकार मंडळी देखील हजर राहणार असल्याचे सांगितले जात आहे.