सुप्रीम कोर्टाचा अदानी पोर्टला मोठा दिलासा; हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती!

    11-Jul-2024
Total Views |
adani port gujrat high court decision
 


नवी दिल्ली :        सर्वोच्च न्यायालयाने गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देत अदानी समूहाला दिलासा दिला आहे. कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बदराजवळील १०८ हेक्टर तृण जमीन गावकऱ्यांना परत करण्याची परवानगी उच्च न्यायालयाकडून देण्यात आली होती. या निर्णयास आता सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय घेत उच्च न्यायालयाच्या निर्णयास स्थगिती दिली आहे.

दरम्यान, अदानी समूहाला देण्यात आलेली १०८ हेक्टर जमीन गुरे चरण्यासाठी गावकऱ्यांना परत मिळविली जाईल, असा निर्णय गुजरात उच्च न्यायालयाने दिला होता. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आता कच्छ जिल्ह्यामधील नवीनाल गावातील स्थानिकांना गौचर (गुरे चरण्यासाठी) जमिनीची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे.
 

हे वाचलंत का? -    काय आहे पीएम-आशा योजना?
 

गुजरात उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत गौचर जमिनीच्या कमतरतेविषयी आवश्यक पावले उचलण्याचे आवाहन राज्य सरकारकडून प्रतिज्ञापत्रात दिलेल्या उत्तरात करण्यात आले होते. दरम्यान, कच्छ प्रदेशातील सुमारे १०८ हेक्टर जमीन वर्ष २००५ मध्ये अदानी समूहाला देण्यात आली होती ती परत मिळवून देण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.

वर्ष २०१४ मध्ये, गुजरात सरकारकडून अतिरिक्त चराऊ जमीन देण्याचे आश्वासन दिल्यानंतर उच्च न्यायालयाने प्रारंभिक जनहित याचिका निकाली काढली आहे. मात्र, या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने उच्च न्यायालयात सरकारच्या विरोधात अवमान याचिका दाखल करण्यात आली होती.