उपराष्ट्रपती आज विधान भवनात

    11-Jul-2024
Total Views |

jagdeep dhankawde
मुंबई : देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड हे गुरुवार, दि. ११ जुलै रोजी महाराष्ट्र विधान भवनाला भेट देणार आहेत. सायंकाळी ५ वाजता ते विधिमंडळात दाखल होतील. उपराष्ट्रपती धनकड हे विधिमंडळ भेटीदरम्यान विधानसभा आणि विधान परिषदेतील सदस्यांशी संवाद साधतील. कायदेमंडळाचे सभासद म्हणून आमदारांना येणारे अनुभव ते जाणून घेतील. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून ते विधानभवनातील कामकाजाची माहिती घेतील.