फनेल झोन'मधील इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागणार

‘हाय फ्रिक्वेंसी ट्रान्स्मीटर’बाबत केंद्रीय नागरी उड्डाण विभागासमवेत लवकरच बैठक

    11-Jul-2024
Total Views |

foller zone  
मुंबई : अंधेरी (पश्चिम) डीएननगर येथील भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्समीटर परिघातील इमारतींचा पुनर्विकास करणे, गोराई येथील जागा प्राधिकरणाला देणे आणि डीएन नगर येथील जागा महानगरपालिकेला देण्याबाबत यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली आहे. याबाबत केंद्रीय नागरी उड्डाण विभागाला पत्रही देण्यात आले आहे. लवकरच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री, लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी गुरुवार, दि. ११ जुलै रोजी विधानसभेत दिली.
 
याबाबत सदस्य मनीषा चौधरी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. उत्तरादाखल मंत्री सामंत म्हणाले की, भारतीय विमानतळ प्राधिकरण व महानगरपालिका यांच्या संयुक्त सभेमध्ये गोराई येथील महानगरपालिकेच्या जागेवर ट्रान्स्मीटर स्थलांतरित करून डीएननगर येथील प्राधिकरणाच्या जागेवर महापालिका उद्यानाचा विकास करणार आहे. या निर्णयामुळे भविष्यात विमानतळाच्या हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्स्मीटर परिघाच्या आत असलेल्या इमारतींचा पुनर्विकास करता येईल. याबाबत केंद्रीय नागरी उड्डाण विभागासोबत बैठक घेवून चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.