मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट टळणार!

नऊ दिवस पाऊस, पुढील ५३ दिवसांच्या पाणीसाठ्याची वाढ!

    11-Jul-2024
Total Views |

पाणी
 
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये दि. १ जुलै ते ९ जुलैपर्यंत झालेल्या पावसामुळे पुढील ५३ दिवस पुरेल इतक्या पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. दरम्यान जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस पडल्यास मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही तलाव भरून वाहू लागतील. तसेच मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट ही टळेल. १ जुलैला सात तलावात एकूण ८५,६०५ दशलक्ष लीटर (५.९१टक्के) म्हणजे २१ दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक होता.
 
त्यानंतर अधूनमधून मुंबईत पाऊस पडत राहिला. दरम्यान दि. ८ जुलै ते दि. ९ जुलैपर्यंत झालेल्या जोरदार पावसामुळे सात तलावात एकूण २ लाख ९६ हजार ३४८ दशलक्ष लीटर (२०.४८) टक्के म्हणजे पुढील ७४ दिवस पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला. पण दररोजच्या वापरातील पाणीसाठा वजा केल्यास ५३ दिवस पुरेल इतका पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे २१ ऑगस्टपर्यंत मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.
 
दरवर्षी मुंबईला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटर इतक्या पाणीसाठ्याची आवश्यकता भासते. अन्यथा पाणीसाठा जमा नसल्यास पालिकेला पाणीकपात करावी लागते. पण आता मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट टाळणार असल्याचा अंदाज आहे.