'मुसलमान’ म्हणून धर्माच्या आधारे आरक्षण देता येणार नाही!

सुधीर मुनगंटीवारांनी केले स्पष्ट

    11-Jul-2024
Total Views |
 
Mungantivar
 
मुंबई : राज्यघटनेमध्ये धर्माच्या आधारे आरक्षण देण्याचे प्रावधान नाही. मुसलमान समाजामध्ये कुणी मागास असतील, तर त्यांना मागासवर्गीयांसाठी असलेल्या आरक्षणातून लाभ घेता येतो. पण मुसलमान म्हणून धर्माच्या आधारे आरक्षण देता येणार नाही, असे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवार, दि. ११ जुलै रौजी विधानसभेत स्पष्ट केले.
 
हे वाचलंत का? -  एमसीएचा अर्ज न भरण्यासाठी पटोलेंना ठाकरेंचा फोन!
 
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी माहिती सूत्राच्या अंतर्गत (पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन) विधानसभेत मुसलमानांना आरक्षण प्राप्त झाले नसल्याचा विषय उपस्थित केला. मुसलमानांसाठी सरकारने लवकरात लवकर आरक्षण घोषित करावे, अशी मागणी आझमी यांनी केली. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी वरील उत्तर दिले. मतांच्या राजकारणामध्ये धर्म आणू नका. आपण सर्व भारत मातेचे सपूत आहोत, या शब्दांत सुधीर मुनगंटीवार यांनी धर्माच्या आधारे मुसलमानांना आरक्षण देता येणार नाही, ही सरकारच्या वतीने भूमिका स्पष्ट केली.