डाव्यांचा गड भेदून विजय! ब्रिटनच्या संसदेत भगवद्गीतेला साक्ष मानून शपथ; कोण आहेत, भारतवंशीय 'शिवानी राजा'?

    11-Jul-2024
Total Views |
 shivani raja
 
लंडन : ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत लीसेस्टर पूर्वमधून विजयी झालेल्या भारतीय वंशाच्या शिवानी राजा यांनी संसदेत शपथ घेतली तेव्हा सर्वांचे वेधले. शिवानी राजा यांनी शपथ घेत असताना त्याच्या हातात भगवद्गीता पाहून संसदेत बसलेले सर्व लोक आश्चर्यचकित झाले. याच वातावरणात शिवानी यांनी खासदारपदाची शपथ घेतली.
 
गर्वाने स्वत:ला हिंदू म्हणवणाऱ्या शिवानी राजा ब्रिटनच्या पूर्वेकडील लीसेस्टरमधून विजय मिळवला आहे. त्यांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या वतीने विजय मिळवला आणि मजूर पक्षाचे उमेदवार राजेश अग्रवाल यांचा पराभव केला. शिवानी राजा यांना या निवडणुकीत १४,५२६ मते मिळाली तर लेबर पार्टीचे राजेश अग्रवाल यांना केवळ १०,१०० मते मिळाली. याशिवाय लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे जफर हक्क यांना केवळ ६३२९ मते मिळाली.
 
शिवानी राजा तसेच कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा हा मोठा विजय आहे, हे विशेष. कंझर्व्हेटिव्ह पक्षाने तब्बल ३७ वर्षांनंतर हा विजय मिळवला आहे. या जागेवर मजूर पक्ष सातत्याने कब्जा करत होता. शिवानी राजा या लीसेस्टरमध्ये जन्मलेली आणि धर्माभिमानी हिंदू असलेल्या पहिल्या पिढीतील ब्रिटिश नागरिक आहेत. शिवानी राजा यांच्या वेबसाइटनुसार, शिवानी राजा यांचे आई-वडील ७० च्या दशकाच्या उत्तरार्धात केनिया आणि भारतातून लीसेस्टरला गेले.
 
शिवानी यांन डी मॉन्टफोर्ट विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी फार्मास्युटिकल आणि कॉस्मेटिक सायन्समध्ये पदवी प्राप्त केली आहे आणि नंतर इंग्लंडमधील काही मोठ्या कॉस्मेटिक्स ब्रँडमध्ये काम केले आहे. मागच्या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी लीसेस्टर ईस्टमध्ये कथाकार गिरीबापूंच्या 'शिवकथा' कार्यक्रमाला हजेरी लावली होती. २९ वर्षीय शिवानी यांनी २०२२ मधील भारत विरुद्ध पाकिस्तान टी-२० आशिया चषक सामन्यानंतर इस्लामिक कट्टरवाद्यांनी हिंदूंना लक्ष्य करून हिंसाचार केला होता. अशा स्थितीत शिवानी यांनी हा विजय मिळवला.