विधानसभेत मविआ २२५ पेक्षा जास्त जागा जिंकेल : शरद पवार

    11-Jul-2024
Total Views |
 
Sharad Pawar
 
मुंबई : येत्या विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीच्या २२५ पेक्षा जास्त जागा निवडून येतील, असा दावा शरद पवार यांनी केला आहे. गुरुवारी आज उदगीरचे माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा प्रक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
 
शरद पवार म्हणाले की, "महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात आहे. कालच्या लोकसभा निवडणूकीत लोकांनी हे चित्र बदलण्याच्या दृष्टीने निकाल दिला आणि ४८ पैकी ३१ लोकांना, आपल्या विचारांना शक्ती दिली. एकप्रकारे नवीन इतिहास घडवला. येत्या विधानसभेच्या निवडणूकीत २८८ पैकी २२५ पेक्षा जास्त जागा विरोधकांच्या निवडून येतील, असं चित्र मला दिसतंय," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  बीडमध्ये मनोज जरांगेंची शांतता रॅली!
 
तसेच उदगीर आणि देवळाली मतदारसंघातील जनतेने ज्यांच्यावर विश्वास ठेवला, निवडून दिलं त्यांनीच जनाधाराचा घात केला. अशा लोकांना धडा शिकवावा लागेल, असेही शरद पवार म्हणाले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.