पोलिसांवर दगडफेक! कोर्टाने ५ काँग्रेस कार्यकर्त्यांचा जामीन अर्ज फेटाळला

    11-Jul-2024
Total Views |
 Ahmedabad court
 
गांधीनगर : अहमदाबादमध्ये हिंदू, भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांवर हल्ला करणाऱ्या ५ काँग्रेस कार्यकर्त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. या काँग्रेस कार्यकर्त्यांनी दि. २ जुलै रोजी अहमदाबादमध्ये दगडफेक आणि दंगल केली होती. राहुल गांधींनी संसदेत हिंदूंविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनाची घोषणा केली होती, त्यानंतर त्यांच्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता.
 
यादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांवर दगडफेकही केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अहमदाबादचे सत्र न्यायाधीश जयेशकुमार ईश्वरलाल पटेल यांच्या कोर्टाने पाच काँग्रेस नेत्यांना जामीन अर्ज फेटाळला. न्यायालयाने, घटनेची छायाचित्रे आणि सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर, हे “सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करण्याचे स्पष्ट प्रकरण” आणि “पोलीस यंत्रणेवरील हल्ल्याचे स्पष्ट प्रकरण” असल्याचे सांगितले.
  
जखमी व्यक्तीच्या डोक्याला आठ टाके पडले होते, असेही न्यायालयाने नमूद केले. न्यायाधीशांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की "आरोपींपैकी काही कोणत्याही पक्षाशी संबंधित असू शकतात, परंतु त्यांना कायदा आणि सुव्यवस्था स्वतःच्या हातात घेण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही आणि कायद्यात अशी कोणतीही तरतूद नाही."
  
अहमदाबाद शहरातील पोलीस हवालदार आणि भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) अध्यक्ष यांच्या दोन तक्रारींच्या आधारे काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी हर्ष ईश्वरभाई परमार (२३), विमलभाई पानसारा (५०), मनीष ठाकोर (४७), संजय बारोट ५७), मुकेशभाई दतनिया (६८) यांना पालडी पोलीस ठाण्याचे हवालदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून अटक करण्यात आली आहे.