'या' कंपनीने घेतला मोठा निर्णय; नव्या सहा कंपन्या लवकरच बाजारात!

    10-Jul-2024
Total Views |
vedanta group decision agm


नवी दिल्ली :     वेदांता ग्रुप आपल्या व्यवसायांच्या प्रस्तावित विलगीकरणासह पुढे जात अन्य सहा कंपन्यांना वाट मोकळी करून देईल, असे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी सांगतिले आहे. तसेच, वेदांता ग्रुपच्या या निर्णयामुळे सहा स्वतंत्र सूचीबद्ध कंपन्यांमध्ये विभाजित करण्याच्या कंपनीच्या योजनेतील एक महत्त्वाचे पाऊल असेल.


हे वाचलंत का? -      मारुती सुझुकी कंपनीचे सीईओ म्हणाले, हायब्रीड कारर्स कार्बन....!


दरम्यान, वेदांता कंपनीला व्यवसायांच्या प्रस्तावित विलगीकरणासाठी तिच्या बहुसंख्य कर्जदारांकडून मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे नव्या स्वतंत्र सहा सूचीबद्ध कंपन्यांमध्ये विभाजित करण्याच्या कंपनीच्या योजनेतील एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या निर्णयासह वेदांत व्यवसाय डिमर्ज करून पुढे जात आहे, असे अनिल अग्रवाल यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले की, प्रत्येक डिमर्ज्ड घटक स्वतःचा मार्ग आखेल, परंतु वेदांताच्या मूलभूत मूल्यांचे, त्याच्या उद्यमशीलतेचे आणि जागतिक नेतृत्वाचे पालन करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ५९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांना संबोधित करताना आम्ही आमच्या व्यवसायांचे विलगीकरणाने नव्या ६ कंपन्या स्वतःच्या अधिकारात निर्माण होतील.