"नियमांच्या नावाखाली पैशांची वसूली..."; निर्मात्याने झाडावर चढून केलं आंदोलन; मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

    10-Jul-2024
Total Views |

marathi film 
 
 
 
मुंबई : मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक प्रवीणकुमार मोहारे यांनी आज १० जुलै २०२४ दादरच्या शिवाजी पार्क परिसरात आंदोलन केलं होतं. झाडावर चढून त्यांनी आंदोलन केलं असून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. प्रवीणकुमार यांनी झाडावर बसूनच प्रसारमाध्यमांशी संवाद साधून त्यांच्या आंदोलनाचं कारण सांगितलं आहे.
 
प्रवीण कुमार मोहारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. याशिवाय त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याविषयी पत्र लिहिलं असून त्यांनी लिहिले आहे की, "सेन्सॉर बोर्डामधूनअॅनिमल वेल्फेअर बोर्डाच्या नियमांना हटवण्याची मागणी त्यांनी केलीय. सिनेमात प्राण्यांंचा वापर केल्याने सेन्सॉर बोर्डामार्फत AWBI (animal welfare board of india) निर्मात्यांकडून ३० हजार रुपये नियमांच्या नावाखाली वसूल करतात. हे नियम बदलावेत", अशी मागणी प्रवीणकुमार यांनी केलीय. त्यांनी नुकताच 'शिरच्छेद प्रेमाचा' हा चित्रपट बनवला आहे.
 
प्रवीण कुमार मोहारे हे २०१४ मध्ये सेन्सॉरबोर्ड भ्रष्टाचारविरोधात कार्यकर्ते म्हणून सहभागी होते. २०१४ साली राकेश कुमार हा निर्मात्यांना नियमांच्या नावाखाली लुबाडत होता. प्रवीण कुमार यांनी तक्रार दाखल केल्याने राकेश कुमारला अटक होऊन त्यांना सेन्सॉर बोर्डाने हटवलं होतं.
 
 
 
प्रवीण कुमार पुढे म्हणाले की, "चित्रपटात कोंबडी, गाय, बैलगाडी असा प्राण्यांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे ३० हजार रुपये भरा आणि सीन पास करुन NOC घ्या, असा AWBI चा नियम असल्याचं सेन्सॉर बोर्डाने सांगितलं. यामुळे निर्माते-दिग्दर्शकांना ब्लॅकमेल केलं जातं. चित्रपटात बैलगाड्या, कोंबड्या आणि आपली संस्कृती दाखवली तर त्यांना प्राण्यांवर अन्याय झाला असं वाटतं. आता आम्ही उघडे बनवायचे का, असा संतप्त सवाल प्रवीण कुमार यांनी विचारलाय. अशाप्रकारे शिवाजी पार्क परिसरात झाडावर चढून त्यांनी आंदोलन केलं.