भारत-रशियात १०० अब्ज डॉलर व्यापार उद्दिष्ट!

    10-Jul-2024
Total Views |
india russia trade


नवी दिल्ली :       पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच रशिया दौरा करत महत्त्वाच्या करारांवर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पतीन यांच्यासोबत चर्चा केली आहे. या चर्चेत मोदी आणि पुतीन यांनी द्विपक्षीय चर्चेत संपूर्ण जग जग अन्न, खत आणि इंधनाच्या कठीण परिस्थितीतून जात असताना भारत आणि रशियाच्या मैत्रीमुळे देशातील शेतकऱ्यांची खताची मागणी पूर्ण झाली आहे.

दरम्यान, २२व्या वार्षिक शिखर परिषदेसाठी उभय देशांत २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढविण्यास सहमती दर्शविली आहे. या करारात पाश्चात्य निर्बंधांना रोखण्यासाठी दोन्ही देशांच्या राष्ट्रीय चलनांचा वापर समाविष्ट करण्यात आला आहे. युक्रेन-रशिया संघर्षानंतर नरेंद्र मोदी यांची पहिलीच भेट होती.
पंतप्रधान मोदींनी महामारी आणि भू-राजकीय प्रवाह असूनही देशाला अन्न, इंधन आणि खते पुरवठ्यातील संकट टाळण्यास मदत करणाऱ्या रशियाच्या समर्थनाचा विशेष उल्लेख केला. तसेच, या सहकार्याकरिता राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे आभार देखील मानले आहेत. रशिया-युक्रेन संघर्षात झालेल्या नागरी मृत्यू आणि एकुणातच संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी पंतप्रधान मोदींनी यांनी या भेटीत विनंती केली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पुतीन यांनी रशियन सैन्यात भरती झालेल्या सर्व भारतीयांना लवकरात लवकर सोडण्याची थेट विनंती मोदींनी केली आहे. या संघर्षात या वर्षी चार भारतीय मारले गेले आहेत. तथापि, युद्ध आघाडीवर असलेल्या सुमारे ४० सैनिकांचा सोडण्याचा निर्णय राजनैतिक चर्चेद्वारे घेतला जाईल. विशेष म्हणजे उभय देशांत २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे.