सेटवर बच्चन साहेबांनी ‘या’ गोष्टीसाठी परवानगी मागितली आणि …; ‘कल्की’चे दिग्दर्शक झाले नि:शब्द

    10-Jul-2024
Total Views | 36

Kalki 2898 AD 
 
 
 
मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक नाग अश्विन यांचा कल्की २८९८ एडी हा चित्रपट सध्या जगभरात डंका वाजवत आहे. बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड तयार करत या चित्रपटाने जगभरात ९०० कोटींची कमाई केली आहे. आता लवकरच हा चित्रपट हजार कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल. यात अमिताभ बच्चन, प्रभास, कमल हासन व दीपिका पदुकोण यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. दरम्यान, सेटवरील गमती सांगताना दिग्दर्शक नाग अश्विन यांनी बच्चन साहेबांबद्दल एक विशेष गोष्ट सांगितली आहे.
 
“अमिताभ बच्चन ५५ वर्षांपेक्षा अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. परंतु, आजही त्यांच्या मनात प्रत्येक सीनबद्दल अगदी लहान मुलांसारखी उत्सुकता असते आणि हे आजच्या पिढीने शिकण्यासारखं आहे”, असे ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विन यांनी सांगितलं. तसेच, हा माझ्यासाठी केवळ एक चित्रपट नसून या संपूर्ण प्रवासात खूप काही शिकल्याचं दिग्दर्शकाने ‘इंडिया टूडे’शी बातचीत करताना म्हटलं.
 
दिग्दर्शक नाग अश्विन अमिताभ बच्चन यांच्याबद्दल म्हणाले की, “बिग बींच्या मनात ते चित्रपटात ८ फूट उंच कसे दिसतील हे जाणून घेण्यासाठी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. परंतु, एवढे मोठे अभिनेते असूनही त्यांनी कधीच कोणत्याही गोष्टीत हस्तक्षेप केला नाही. प्रत्येक गोष्ट ते धीराने घ्यायचे. शूटिंगसाठी एवढा प्रोस्थेटिक मेकअप, विग व दाढी लावून बसायचे पण, कधीच कोणत्याही गोष्टीची त्यांनी तक्रार केली नाही.”
 
पुढे ते म्हणाले की, “चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचं शूटिंग जेव्हा सुरू झालं, तेव्हा सेटवरची त्यांची एक गोष्ट पाहून मी पूर्णपणे नि:शब्द झालो होतो. आम्हाला शूटिंग करताना एके दिवशी खूप उशीर झाला होता. लवकरात लवकर शूटिंग पूर्ण होईल यासाठी आमची टीम खूप प्रयत्न करत होती. एवढ्यात अमिताभ बच्चन सर तिथे आले…आता त्यांना पाहिल्यावर मी त्यांना उशीर का झाला याची कारणं सांगणार होतो…पण, झालं उलटंच. “मी फक्त रेस्टरुमध्ये ( फ्रेश होण्यासाठी ब्रेक ) जाऊन पुन्हा येऊ शकतो का?” असं त्यांनी विचारलं. त्यावर मला काय बोलावं हे सुद्धा सुचत नव्हतं मी म्हणालो, ‘सर तुम्हाला पाहिजे ते तुम्ही करू शकता…तुम्हाला मला विचारण्याची आवश्यकता देखील नाही.’ ते खरंच खूप महान कलाकार आहेत.” असं दिग्दर्शक नाग अश्विन यांनी सांगितलं.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

चिनी कम्युनिस्ट पार्टी अर्थात ‘सीसीपी’ने तेथील फालुन गोंग साधना अभ्यासकांवर केलेल्या अमानुष छळाविरुद्ध या अभ्यासकांनी शांतपणे आवाहन सुरू केले. त्याला आज २६ वर्षे होत आहेत. दि. २० जुलै १९९९ रोजी ‘सीसीपी’चे नेते जिआंग झेमिन यांनी फालुन गोंग आणि त्याच्या लाखो अनुयायांचा छळ सुरू केला आणि संपूर्ण देशात दहशतीची लाट पसरली. कम्युनिस्ट पक्षाने आपल्या राजकीय दडपशाहीच्या दीर्घ इतिहासात विकसित केलेल्या प्रत्येक छळ तंत्राचा वापर करूनही या अभूतपूर्व हल्ल्याचा सामना करत, फालुन गोंग साधकांनी पाठ फिरवली नाही. त्याऐवजी, ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121