सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट सुहास गवते यांचे निधन

    10-Jul-2024
Total Views |

सुहास
 
पुणे : सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट सुहास तानाजी गवते (वय 60) यांचे सोमवारी निधन झाले. त्याच्या निधनामुळे मराठी चित्रपट सृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे. सुहास गवते यांनी बालनाट्यचा मेकअप आणि ड्रेस डिपार्टमेंट पाहत त्यांनी या क्षेत्रात प्रवेश केला. सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांच्या हाताखाली ते तयार झाले. स्मिता तळवलकर यांच्या अस्मिता चित्रचे ते प्रमुख मेकअप मन होते.
 
आजवर 75 पेक्षा अधिक चित्रपट आणि 50 पेक्षा अधिक मालिका यासाठी त्यांनी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केले आहे. तू तिथे मी, घराबाहेर, सातच्या आत घरात, थोडे तुझे थोडे माझे, राजू आदी चित्रपट आणि अवंतिका, पेशवाई, नुपुर, छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी या मालिका त्यांच्या नावावर आहेत. प्रोस्थेटिक मेकअप मध्ये त्यांचा विशेष हातखंडा होता. गवते यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टी एका उत्तम आर्टिस्टला मुकली आहे, अशी प्रतिक्रिया चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिली आहे.