विरोधी पक्षनेत्यांना स्वतंत्र आरक्षण हवंय की, ओबीसीतून ते जाहीर करावं!

    10-Jul-2024
Total Views |
 
Rane
 
मुंबई : विरोधी पक्षनेत्यांना स्वतंत्र आरक्षण हवंय की, ओबीसीतून ते त्यांनी जाहीर करावं, असा घणाघात भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. मंगळवारी मराठा आरक्षणासंबंधी आयोजित सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांनी बहिष्कार टाकला. त्याचे पडसाद आज विधानसभेत उमटले.
 
नितेश राणे म्हणाले की, "कालच्या बैठकीत अनुपस्थित राहिलेल्या विरोधी पक्षाचे खरे चेहरे दिसले. मराठा ओबीसी तरुणांनी आपली डोकी फोडायची, अंगावर केसेस घ्यायच्या आणि या लोकांनी पेटवा पेटवीची भाषा करायची. चर्चा करायची वेळ येते तेव्हा हे पळणारे लोक आहेत. घराघरात वाद निर्माण करणाऱ्या विरोधी पक्षाने समाजाची माफी मागितली पाहिजे," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  मिहीर शाहाला १६ तारखेपर्यंत पोलिस कोठडी!
 
ते पुढे म्हणाले की, "विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका काय? त्यांना स्वतंत्र आरक्षण हवंय की, ओबीसी मधून आरक्षण हवंय ते त्यांनी जाहीर करावं. त्यांची नेमकी भूमिका काय ते त्यांनी जाहीर करावं. समाजाची धुळफेक करून समाजाचे भविष्यात अंधारात टाकणारे हे लोक आहेत," असा घणाघात नितेश राणेंनी विरोधकांवर केला आहे.