मिहीर शाहाला १६ तारखेपर्यंत पोलिस कोठडी!

    10-Jul-2024
Total Views |
 
Mihir Shah
 
मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरणात एक मोठी अपडेट पुढे आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला १६ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मिहीर शाहाला ताब्यात घेण्यात मंगळवारी पोलिसांना यश आलं. त्यानंतर आज त्याला कोर्टात हजर करण्यात आलं होतं.
 
रविवार, दि. ७ जुलै रोजी पहाटे मिहीर शहा याने आपल्या बीएमडब्लू वाहनाने दुचाकीवर जाणाऱ्या दाम्पत्याला धडक दिली होती. वरळी कोळीवाड्यातील रहिवासी असलेले हे दाम्पत्य घरी परतत असताना ही घटना घडली. धडकेनंतर मिहीर शहाने दुचाकीमागे बसलेल्या महिलेला १०० मीटरपर्यंत फरफटत नेले. त्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, या अपघातापूर्वी मिहीर शाहाने जुहू येथील बारमध्ये मद्यप्राशन केले होते. त्यानंतर तो गोरेगावला आपल्या घरी गेला.
 
हे वाचलंत का? -  मराठा आरक्षणाबाबत मविआचे पुतना मावशीचे प्रेम!
 
तेथून पुढे कारच्या चालकासह लाँग ड्राईव्हवर निघाला. वरळी परिसरातून पुन्हा माघारी फिरत असताना, हा अपघात घडला. त्यावेळी मिहीर स्वतः कार चालवत होता, असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. अपघातानंतर मिहीर शाहने पळ काढला होता. तेव्हापासून तो फरार होता. त्याला मंगळवार, दि. ९ जुलै रोजी अटक करण्यात आली. आता त्याला १६ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.