अनंत-राधिकाच्या लग्नाचं मराठी अभिनेत्याला आमंत्रण; म्हणाला, "अंबानींकडून एक माणूस पत्रिका घेऊन..."

    10-Jul-2024
Total Views |

Kalki 2898 AD 
 
 
मुंबई : सध्या सर्वत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्याच लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत संगीत, हळद अशा अनेक प्री-वेडिंग कार्यक्रमांची रेलचेल सुरुच आहे. आणि १२ जुलै रोजी अनंत-राधिका लग्न बंधनात अडकणार आहे. दरम्यान, त्यांच्या लग्नाचे आमंत्रण अनेक मान्यवरांना देण्यात आले आहे. विशेष म्हणजे यात एका मराठी अभिनेत्याची देखील वर्णी लागली आहे.
 
मराठी मालिका आणि चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारणारा अभिनेता श्रेयस राजे याला चक्क अंबानींकडून लग्नाचं आमंत्रण आलं आहे. अंबानींकडून एक व्यक्ती हे आमंत्रण घेऊन श्रेयसच्या घरी पोहोचला होता. इन्स्टावरुन अनंत-राधिकाच्या वेडिंग कार्डचा फोटो श्रेयसने शेअर केला आहे. "आता जावं लागेल लग्नाला", असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.
श्रेयस म्हणतो, "तर, ही दस्तूरखुद्द मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका आहे. ही पत्रिका माझ्यापर्यंत पोहोचावी म्हणून अंबानी मॅनेजमेंटकडून एक अख्खा माणूस अपॉईंट केला होता. जो वांद्रेहून घोडबंदरपर्यंत फक्त ही पत्रिका द्यायला आला", असंही त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
 
 

shreyas  
 
अनंत अंबानी आणि राधिका येत्या १२ जुलैला लग्नगाठ बांधणार असून मुंबईतील जिओ सेंटरवर त्यांचा हा ग्रँड विवाहसोहळा पार पडणार आहे. त्यानंतर १४ जुलैला रिसेप्शनही असणार आहे.