आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलमय गाण्यांचा ‘भक्तीरस’ कार्यक्रम

    10-Jul-2024
Total Views |
 
Music
 
मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त वीर सेनानी फाऊंडेशन आणि स्वरनिनाद फाऊंडेशन प्रस्तुत ‘भक्तीरस - एक विठ्ठलमय त्रिवेणी संगम’ हा कार्यक्रम शनिवारी १३ जुलै रोजी सायंकाळी ६:३० वाजता साजरा होणार आहे. विले पार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात हा कार्यक्रम साजरा होणार आहे.
 
गानसरस्वती किशोरी आमोणकर, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. कुमार गंधर्व, श्रीनिवास खळे, पं. भीमसेन जोशी, आणि बालगंधर्व यांच्या रचनांवर आधारीत या कार्यक्रमात विदुषी मंजुषा पाटील, स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली, पं. रघुनंदन पणशीकर हे सादरकर्ते असणार आहेत. मंगला खाडीलकर या कार्यक्रमाचे निरूपण करणार आहेत. या कार्यक्रमाची तिकिटे हॉलवर उपलब्ध आहेत सोबतच ९८१९९६५४४४, ९८३३५१७५०१ या क्रमांकांवर ऑनलाइन बूकिंग करण्याचीही सोय आहे.